हिंजवडीत पुन्हा अपघात; RMC ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, तरुणीचा जागीच मृत्यू…..


पुणे : गेल्या काही महिन्यांपासून हिजवडी परिसरात डंपर आणि सिमेंट मिक्सरच्या धडकेत अपघाताच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. अशातच आता हिंजवडी मारुंजी परिसरात कसारसाई धरणावरून पर्यटन करून घरी परतत असताना आरएमसी ट्रकच्या धडके 19 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.रीदा इमरान खान असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी रीदा आणि तिचा मित्र विवेक हे दोघे पुण्याहून कासारसाई परिसरामध्ये पर्यटनासाठी आले होते. पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर पुण्याच्या दिशेने परतत असताना मारुंजी परिसरात आले असता मागून त्यांना आरएमसी ट्रकने धडक दिली, या धडकेत दुचाकीवरील रिदा खाली पडली व तिचा या घटनेत दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर तात्काळ हिंजवडी पोलिसांनी आरएमसी ट्रकचा चालक अजमल अख्तर अन्सारी याला अटक केली असून त्याच्यावरती हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी आयटी परिसरात अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी दि.१७ दुपारी डम्परच्या धडकेत चाकाखाली चिरडल्याने हिंजवडीतील एका २० वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आता या परिसरात अपघात घडल्याने पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!