Nirmala Sitharaman : मोदी सरकारचा मोठा निर्णय! कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी घटवला, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची घोषणा…


Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जीएसटी परिषदेची ५४ वी बैठक पार पडली. जीएसटी काउन्सीलने कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आता कर्करोगावरील औषधांवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के एवढा जीएसटी लावण्यात येणार आहे. मात्र, आरोग्य आणि जीवन विम्याच्या प्रीमियम पेमेंटवरील जीएसटीसंदर्भात काउन्सिलने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

याशिवाय, धार्मिक यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेचा वापर केल्यास आता १८ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटीच द्यावा लागणार आहे. या बैठकीत हेल्थ इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर लागणारा जीएसटी कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली. Nirmala Sitharaman

यानंतर हे प्रकरण अधिक अभ्यासासाठी ग्रुप ऑफ मिनिस्टर्सकडे पाठविण्यात आले. जीओएमला ऑक्टोबर, २०२४ पर्यंत आपला अहवाल तयार करावा लागेल. यावर आता नोव्हेंबर, २०२४ मध्ये होणाऱ्या जीएसटी काउंसिलच्या बैठकीत चर्चा होईल.

दरम्यान, या बैठकीत धार्मिक यात्रा करणाऱ्यांनाही दिलासा देण्यात आला आहे. धार्मिक यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेचा वापर केल्यास आता १८ ऐवजी ५ टक्के एवढाच जीएसटी भरावा लागणार आहे. उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!