5 जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग! चिंचवडमध्ये 72 अनधिकृत 37 होर्डिंगवर कारवाई


पिंपरी चिंचवड : किवळे येथील अनधिकृत होर्डिंग पडून 5 जणांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाले. त्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई मोहिम तीव्र केली आहे.
आतापर्यंत एकूण 37 होर्डिंग पाडण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात केवळ अनधिकृत 72 होर्डिंग असल्याचा महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचा दावा आहे. त्यापैकी 36 होर्डिंग विभागाच्या पथकाने रविवार (दि.23) पर्यंत पाडले आहेत.

पुनावळे, मुंबई-बेंगलुरू महामार्ग, पुनावळे रस्ता, ताथवडे, हिंजवडी-वाकड रस्ता, कासारवाडी, देहू-मोशी रस्ता, दिघी, इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसी, विनोदेवस्ती, मारूंजी, कस्पटे वस्ती, लोंढेवस्ती, किवळे या भागांतील हे अनधिकृत होडिर्ंग आहेत. पालिकेच्या पथकाने ते होर्डिंग पाडून जप्त केले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईस स्थगिती दिलेल्या 434 अनधिकृत होर्डिंग व्यतिरिक्त 72 अनधिकृत होडिर्ंग पालिकेस आढळून आले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.