Ankita Patil : वडिलांना धमकी दिली तर मी पण त्यांना…! हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचा थेट इशारा

Ankita Patil : इंदापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी खालच्या भाषेत जाऊन शिवीगाळ करत असल्याचे दिसून आले आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्याला इंदापुरात फिरु न देण्याची धमकी आल्याची तक्रार केली आहे.
त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा इशारा दिला आहे. वडिलांना धमकी दिली तर ठाकरे शैलीत उत्तर देणार, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांनी दिला आहे. प्रत्येकाने संस्कृती जपून पातळी सांभाळून बोलावे, असे आवाहन अंकीता पाटील यांनी केले आहे.
माझ्या वडिलांबाबत असे एकेरी शब्द तुम्ही वापरत असाल, जे तालुकाध्य आहेत, लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती असतात, ते माझ्या वडिलांबाबत असे शब्द उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ठाकरे शैलीत उत्तर देऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवावे. ही आपली संस्कृती नाहीय. मला त्यांना एकच सांगायचे आहे, पातळी सांभाळून बोला. आम्हीपण आमची पातळी सांभाळून बोलत आहोत, असे अंकिता पाटील म्हणाल्या. Ankita Patil
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर फिरु न देण्याची धमकी आली होती. या धमकीनंतर त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. मित्रपक्षातील काही पदाधिकारी शिवराळ भाषेचा वापर करतात, असे हर्षवर्धन पाटलांनी लिहले आहे. सुरक्षेची चिंता असल्याने फडणवीसांना पत्र लिहिलंय, असं हर्षवर्ध पाटलांनी म्हंटले आहे.