अंजली दमानियांच्या नव्या आरोपाने उडाली खळबळ! योगेश कदमांचं टेन्शन वाढलं..

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सावली रेस्टॉरंटवरून मंत्री योगेश कदम आणि रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सावली रेस्टॉरंट हा डान्सबार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
तसेच वाळूच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप केला होता. हा रेस्टॉरंट डान्सबार असल्याचा आरोप करत त्यांनी वाळू माफियांशी संबंधित काही गंभीर मुद्दे अधिवेशनात उपस्थित केले होते.
दमानिया यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, योगेश कदम यांच्याबाबत माझ्याकडे खूप माहिती आहे. ती जर मी बाहेर काढली तर चुकीचा संदेश जाईल, म्हणून मी थेट न्यायालयात जाणार आहे.” हे वक्तव्य करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. त्यामुळे आगामी काळात योगेश कदम यांच्यावर कायदेशीर संकट वाढू शकते.
त्याचवेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. भाजपचे नेते मला सर्वाधिक आवडले असते वाजवायला, पण त्यांच्या जवळ चांगली खाती नाहीत. सर्व चांगली खाती अजित पवार गट आणि शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येत आहेत, असंही दमानिया म्हणाल्या आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी योगेश कदम यांना पाठिंबा दर्शवला होता. कदम काम करणारा कार्यकर्ता आहे. टीकेवरून काम थांबवता येत नाही, असं ते म्हणाले होते. त्यामुळे त्या वेळी कदम यांना दिलासा मिळाला होता.