Anjali Damania : अजित पवारांकडे इतका पैसा येतो कुठून? अंजली दमानिया यांच थेट मोठं वक्तव्य…


Anjali Damania : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. दमानिया यांनी थेट अजित पवार यांच्या अर्थिक साम्राज्यावर नेम धरला असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांनी दमानिया यांच्या कौटुंबिक परदेश वारीवरून अतिशय खालच्या स्तराची टीका केली होती, यानंतर दमानिया पुन्हा आक्रमक झाल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, अंजली दमानिया म्हणाल्या, आज दुपारी चार वाजता मी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत मी माझ्या उत्पन्नाची माहिती देणार आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे आणि या राज्याच्या राजकारणातील नेत्यांनी देखील त्यांच्या उत्पन्नाविषयीची माहिती द्यायला हवी. त्यांचा उत्पन्नाचा मार्ग सांगायला हवा. Anjali Damania

अजित पवार यांच्याकडे इतका पैसा कुठून येतो हे त्यांनी सांगायला हवे.कार्यकर्त्यांना, पदाधिकार्‍यांना गुलाबी गाड्या देण्यासाठी पैसे येतात कुठून? हा अफाट खर्च ते कसा करतात हे अजित पवारांनी एकदा स्पष्ट करायला हवे, अशी मागणी दमानिया यांनी केली.

मी गेल्या ११ वर्षांपासून त्यांच्याविरोधात लढत आहे. हल्ली अनेक पक्षांमधील नेते त्यांची बाजू मांडण्यासाठी, त्यांच्यावरील टीकेला व टीकाकारांना उत्तर देण्यासाठी राम आणि श्याम बाळगतात. या नेत्यांवर कोणी टीका केली तर हे राम-श्याम बाहेर येऊन प्रत्युत्तर देतात.

अंजली दमानिया म्हणाल्या, अमोल मिटकरी माझ्याविरोधात वाईट बोलले नाहीत. कारण त्यांना कदाचित कल्पना असेल किंवा त्यांनी गुगलवर माहिती गोळा केली असेल. सुरज चव्हाण मात्र ताळतंत्र नसलेला माणूस आहे. मी या लोकांना आता सरळ करणार आहे. यांनाच नाही तर, यांच्या मालकांनाही सरळ करणार आहे.

मी काय आहे हे अजित पवारांना माहीत आहे. तटकरे, भुजबळांना देखील माहिती आहे. मी तत्त्वांवर काम करते. सुरज चव्हाणांसारख्या नव्या लोकांना काही माहिती नसते. ते काहीही बोलतात. त्यांना अजित पवारांना दाखवायचे असते की, बघा दादा मी तुमच्यासाठी किती लढत आहे. मी आता यांना आणि यांच्या मालकांना धडा शिकवणार आहे. तुम्ही राजकारणात येऊन निवडणूक लढण्याच्या आधीच तुमचे राजकारण संपवणार आहे, असा इशारा दमानिया यांनी दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!