Anil Deshmukh : महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीसच जबाबदार!! आमदार थेट बोलले….


Anil Deshmukh  : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहा पैकी ७ ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे.

तर भाजप २ आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या १ ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातील सर्वत मोठा पक्ष ठरला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली हे लोकांना आजिबात आवडलं नाही आणि यामुळेच महाराष्ट्रात भाजप अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. मी म्हणालो होतो महाराष्ट्रात चमत्कार होईल, आज तोच चमत्कार झाला आहे.

राज्यात महावीकास आघाडीचे 30 खासदार निवडून आले आहेत. तर विदर्भातही मोठे यश मिळाले आहे. आगामी रणनीती वरिष्ठ नेते ठरवती आणि राज्यात जसा चमत्कार झाला, तसा केंद्रात देखील व्हायला पाहिजे. अशी अपेक्षाही अनिल देशमुख यांनी बोलताना व्यक्त केली आहे. Anil Deshmukh

सध्या भाजपला मंथनाची गरज आहे. या पराभवाला खऱ्या अर्थाने जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी फोडाफोडीचे राजकारण केले, हे लोकांना आवडलं नाही आणि यामुळेच महाराष्ट्रात भाजप अपयशी ठरल्याचा दावाही अनिल देशमुख यांनी केला आहे.

एकीकडे भाजप ४५ प्लस बोलत असताना त्यांनी आधीच चिंतन मंथन करणं गरजेचं होतं. मात्र, आता बैठका घेऊन त्यांना काहीही उपयोग नाही. असा टोलाही अनिल देशमुख यांनी भाजपला लगावला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!