Anil Babar Passed Away : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..
Anil Babar Passed Away : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज आकस्मिक निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते.
न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती.
त्यांनी सरपंच पदापासून राजकारणातील अनेक पदे भूषवली असून जिल्हा परिषद सदस्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मागीलवर्षी झालेल्या राजकीय उलथापालथीत ते अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिंदे गटात ते सहभागी झाले होते. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी ओळख होती.
सांगलीतील खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी अनिल बाबर यांचा जन्म झाला. त्यांनी सरपंच पदापासून राजकारणाच्या विविध पायऱ्या पादाक्रांत केल्या. जिल्हा परिषद सदस्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
जुन्या पिढीसोबतच नवीन पिढीशी ते सहज मिसळून जातात. गेल्यावर्षी झालेल्या राजकीय उलथापालथीत ते अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिंदे गटात ते सहभागी झाले. Anil Babar Passed Away
बाबर यांची पश्चिम महाराष्ट्रात पाणीदार आमदार अशी ओळख असून ते खानापूर-आटपाडी या मतदारसंघासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी खेचून आणता येईल, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले.
त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून यासाठी प्रयत्न केले. या योजनेला त्यांनी टेंभू योजना असे नाव दिले. आज त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.