अमेरिकेत एका भारतीय शास्त्रीय नर्तकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या..


अमेरिका : एका ३४ वर्षीय भारतीय शास्त्रीय नर्तकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अमेरिकेतुन समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अमरनाथ घोष अशे अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. जानेवारी २०२४ पासून ५-६ विद्यार्थ्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमरनाथ वॉशिंग्टन विद्यापीठाचा विद्यार्थी होता. तो शास्त्रीय नर्तक होता. सेंट लुईस, मिसुरी येथे त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. तो कुचीपुडी आणि भरतनाट्यम करत होता. सेंट लुईस अकादमी आणि सेंट्रल वेस्ट एंड परिसरात त्याच्यावर अनेक वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तो गेल्या वर्षी पश्चिम बंगालमधून अमेरिकेला गेला होता.

दरम्यान, अमरनाथचे काका शामल घोष यांनी सांगितले की, या घटनेला चार दिवस उलटून गेले असले तरी त्यांच्या पुतण्याचा अमेरिकेत मृत्यू झाल्याची संपूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!