आमच्या शेताजवळ का आला म्हणत वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण, चार आरोपींवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?


उरुळी कांचन : जुन्या भांडणाचा राग मनात धरून तू आमच्या शेताजवळ का आला म्हणून एका ६० वर्षाच्या व्यक्तीला चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी हिंगणगाव (ता. हवेली) येथील चौघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल भानुदास थोरात (वय.२३), प्रदीप मधुकर थोरात (वय.२२), भानुदास लक्ष्मण थोरात (वय.४६), व प्रमोद भानुदास थोरात (वय.२५, रा. सर्वजण, पाटीलवस्ती, हिंगणगाव, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

तर गोरख बाळासाहेब थोरात (वय ६०, रा. हिंगणगाव) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गोरख थोरात यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी गोरख थोरात हे आपल्या कुटुंबियांसमवेत हिंगणगाव परिसरात राहत असून त्यांची शेती आहे. सोमवारी (ता.२०) त्यांच्या शेतीच्या शेजारील वरील इसम हे त्यांच्या शेतातील माती घेऊन जात होते. यावेळी त्या ठिकाणी असलेली गोरख थोरात यांची पाईपलाईन फुटली होती. थोरात यांच्या सुनेने त्यांना याबाबत जाब विचारला त्यावरून त्यांनी सुनेस शिवीगाळ करून शिवीगाळ केली होती.

गुरुवारी (ता. २३) विद्युत रोहीत्राचे काम करण्यासाठी थोरात हे मोटारसायकलवरून शेतात आले असता प्रदीप थोरात व प्रफुल थोरातहि दुचाकीवरून समोरून आले होते. यावेळी खाली उतरून प्रफुल थोरात हा अंगावर धावून आला व तू आमच्या शेतात काय करतोस असे म्हणून गाडीस लाथ मारली.

तसेच यावेळी गोरख थोरात हे गाडीसह जमिनीवर आपटले. तर प्रदीप थोरात याने लाकडी दांडक्याने दावे पंजावर मारले. तसेच प्रफुल थोरात याने हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून याला गोळ्या घातल्या पाहिजे अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, बाजूला शेतात काम करीत असलेले भानुदास थोरात व प्रमोद थोरात यांनी धमकी देऊन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वरील चौघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!