मोठी बातमी! सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न, नेमकं घडलं काय?

नवी दिल्ली : सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टात वकिलाकडून सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. यानंतर त्याला ताब्यात घेतले आहे.

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं. वकिलाने सुनावणी दरम्यान मंचाच्याजवळ जाऊन बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवलं. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला कोर्टाबाहेर काढलं. खजुराहो येथील भगवान विष्णुंच्या एका नुकसानग्रस्त मुर्तीशी संबंधित एक जुन्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी एक टिप्पणी केली.

या टिप्पणींचा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. ‘कोर्टात एका माणसाने आरडाओरडा केला. त्याला आम्ही बाहेर काढलं‘ असे सुरक्षारक्षक यांनी सांगितले आहे. यावेळी तो वकिल आरडाओरडा करत होता, ‘ ‘सनातनचा अपमान सहन करणार नाही‘. CJI गवई हे सर्व सुरु असताना शांत होते.

ते म्हणाले की, ‘अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही. तुम्ही तुमचा युक्तीवाद सुरु ठेवा‘. खजुराहो येथे भगवान
विष्णुंच्या नुकसानग्रस्त मुर्तीची पूनर्स्थापना करण्याबद्दलच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश गवई बोललेले.
