पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी हद्दीत अपघात, महिला जागीच ठार! अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक!!

उरुळी कांचन : पुणे – सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) परिसरात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सोरतापवाडी परिसरातील वाकडा पूल परिसरात शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये अपघाती महिलेच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या व जागेवरच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एक पुरुष व दोन महिला या निगडी येथील असून दुचाकीवरून सोलापूरच्या बाजूने निघाल्या होत्या. यावेळी सोरतापवाडी परिसरातील वाकडा पूल परिसरात आले असता त्यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत सदर महिला रस्त्यात पडल्याने त्यांच्या अंगावरून एक मोठे अज्ञात जड वाहन गेले असल्याची माहिती उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी दिली.
अपघात एवढा भीषण होता कि, या अपघातात महिलेच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या व त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर गाडीवरील आणखी एक पुरुष वेक महिला हे जखमी झाले असून त्यांना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, जखमींना उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानचे सदस्य माउली लाड व संतोष झोंबाडे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले असून पुढील तापस सुरु आहे.