अमूल दूध महागले; प्रति लीटर 3 रुपयांची वाढ..!

मुंबई : सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त खर्च करावा लागणार आहे. कारण अमूल कंपनीने आजपासून आपल्या दूध दरात वाढ केलेली आहे. गुजरात डेअरी सहकारी अमूलने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली. दुधाच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे. नवीन किमती तत्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत.
निवेदनानुसार, या सुधारणेनंतर, अमूल गोल्ड 66 रुपये प्रति लिटर, अमूल फ्रेश 54 रुपये प्रति लीटर, अमूल गायीचे दूध 56 रुपये प्रति लिटर आणि अमूल ए2 म्हशीचे दूध 70 रुपये प्रति लीटर असेल.
Views:
[jp_post_view]