Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा झाले इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नाही तर ‘अशी’ हाक मारणार…


Amruta Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायम चर्चेत असतात. आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मी आजपासून अमृता फडणवीस यांना मॅम नाही तर मॉ अमृता फडणवीस म्हणेल असं विधान भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा अमृता फडणवीस या चर्चेत आल्या आहेत. गणेश विसर्जनानंतर दरवर्षी अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनच्या वतीने समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाते. सकाळी ७:०० वाजता वर्सोवा किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

या प्रसंगी अमृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं की, ‘मी अमृता फडणवीस यांना विनंती करतो की तुम्ही चौपाटीवरील कचरा साफ करतात ही चांगली गोष्ट आहे. Amruta Fadnavis

मात्र राज्यातील राजकारणात जो कचरा आलेला आहे, तो साफ करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. अमृता फडणवीस यांनी आईचे रूप घेतलेले आहे. मुला मुलींसाठी त्या जे काम करत आहेत, त्यामुळं मी आजपासून त्यांना मॅम अमृता नाही तर मॉ अमृता फडणवीस म्हणेल’, असे लोढा यांनी म्हंटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!