Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणारा बुकी अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर


Amruta Fadnavis  मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांकडून (Amruta Fadnavis)  खंडणी वसुली प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी बुकी अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर करण्यात आला. मागच्या काही दिवसात पासून अमृता फडणवीस खंडणी प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. Amruta Fadnavis

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली होती. बुकी अनिल जयसिंघानीला सोमवारी (ता.१९) मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने ५० हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. बुकी अनिल जयसिंघानी हा २० मार्चपासून अटकेत होता. जयसिंघानीची मुलगी आणि भाऊ या सहआरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जामीन मंजूर झाला असला तरी प्रत्येक सुनावणीला आरोपीची हजेरी अनिवार्य असल्याचे देखील न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर साक्षीदारांना न धमकवण्याची निर्देश देखील न्यायालयाने जयसिंघानीला दिले आहेत.अनिल जयसिंघानीवर मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!