एका हातावर साप एका सरडा!! अमृता फडणवीस यांनी केलं वेगळंच धाडस..

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सोशल मीडियावर अमृता फडणवीस नेहमी सक्रिय रहातात. त्यांची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे.
अमृता यांना गाण्याची देखील प्रचंड आवड आहे. त्या नेहमी आपले फोटो शेअर करत असतात. दरम्यान,आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस प्रकाशझोतात आल्या आहेत. याच कारण म्हणजे त्यांनी साप आणि सरडा या दोन प्राण्यांसोबत फोटोशूट केलं आहे.
त्यांच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर वादळ उठले असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. अमृता यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटरून दोन फोटो शेअर केले आहेत.
यातील पहिल्या फोटोत अमृता यांनी आपल्या दोन्ही हातात साप धरलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत त्यांनी हातावर सरडा ठेवलेला दिसून येत आहे.
या फोटोंना अमृता यांनी भन्नाट कॅप्शन सुद्धा दिलं आहे. ‘सर्वात धोकादायक, विषारी आणि भयानक प्राणी फक्त मानव आहेत!’ असं अमृता यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहे. एका नेटकऱ्याने या फोटोंचा संबंध थेट राजकारणासोबत जोडला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीत हेच दिसत आहे, असं त्याने म्हटलं आहे.
अमृता फडणवीस सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफार्मवर सक्रीय असतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील लाखांमध्ये आहे. अनेक घटना, घडामोडी, सण आदींवर त्या व्यक्त होत असतात.