Amravati Lok Sabha Election : सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल, म्हणाले, साडी-किराणा म्हणजे रवी राणा…
Amravati Lok Sabha Election : अमरावती सुद्धा निवडणुकीत धार्मिकवर प्रचार सुरू आहे, हे आम्ही होऊ देणार नाही. साडी-किराणा म्हणजे रवी राणा असं लहान मुलगा सांगत होता, त्यामुळे मी विनंती करतो की, भाजपला निवडणुकीत मतदान करू नका, त्यांना पाडा म्हणजे पाडा, असं म्हणत सुजात आंबेडकरांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.
अमरावती लोकसभेची निवडणूक ही आता चौरंगी होणार हे आज आनंदराज आंबेडकर यांच्या जाहिर सभेवरून दिसून आले. अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावर रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारार्थ जाहिरसभेचं आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तीनही नातू एकाच मंचावर आले. प्रकाश आंबेडकरांच्या जागी सुजात आंबेडकर होते. या सभेसाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी लोकं एकत्र आले होते. यावेळी भीमराव आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला तर, सुजात आंबेडकर यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.
अमरावतीचे पोट्टे-पोट्टीनो जयभीम म्हणत सुजात आंबेडकरांनी भाषणाला सुरुवात केली. सुजात आंबेडकर म्हणाले, एकच निवडणूक घेणार असं जाहीरनाम्यात आहे, त्यामुळे हे घातक आहे. एक वसुली भाई यांचा दिल्लीत बसलेला आहे आणि त्यांची बंदुक आहे ईडी-सीबीआय. Amravati Lok Sabha Election
अमरावती सुद्धा निवडणुकीत धार्मिकवर प्रचार सुरू आहे, हे आम्ही होऊ देणार नाही. साडी-किराणा म्हणजे रवी राणा असं लहान मुलगा सांगत होता, त्यामुळे मी विनंती करतो की, भाजपला निवडणुकीत मतदान करू नका, त्यांना पाडा म्हणजे पाडा, असं म्हणत सुजात आंबेडकरांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.
भीमराव आंबेडकर म्हणाले की, आनंद झाला असेल आम्हाला बघून. सगळ्यांसमोर एकच प्रश्न असेल की, आमचं डिपॉझिट जप्त होते की काय. अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांचा विजय आजच घोषित झाला आहे.
पाच वर्षांपूर्वी अपक्ष उमेदवार निवडून आले, सगळ्यांनी मतदान दिले, पण न्याय दिला का. नाचनेवाले का क्या काम, नाचना हे तो बॉलिवूड हे ना, असं म्हणत त्यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे.