Amravati Crime : सर्वांसमोर दिवसाढवळ्या जागेच्या वादातून आई आणि मुलाला संपवलं!! घटनेने राज्यात खळबळ…


Amravati Crime : राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमरावतीत जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या करण्यात आली आहे. तर वडील थोडक्यात बचावले आहे. ही घटना शहरातील मंगलधाम परिसरात येत असलेल्या बालाजी नगरात काल दुपारी घडली आहे.

या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे. आई कुंदा देशमुख (वय. ६५ वर्षे) आणि मुलगा सुरज देशमुख (वय २५ वर्षे) यांचा मृत्यू झालेल्या आई मुलाचे नावे आहेत. तसेच आरोपी देवानंद लोणारे आणि पत्नी ज्योति लोणारे यांना पोलीस आयुक्त यांच्या विशेष पोलीस पथकाने ताब्यात घेतले.

मंगलधाम परिसरातील बालाजीनगरमध्ये देशमुख कुटुंब गेली अनेक वर्षे राहत होते. विजय देशमुख, कुंदा देशमुख, मोठा मुलगा अंकुश आणि लहान मुलगा सुरज असे चार सदस्य राहत होते. आधी सगळं काही ठीक असताना अचानक हा प्रकार घडला आहे.

घरात लहान मुलगा अंकुश एमआयडीसीमध्ये तर मोठा मुलगा सुरज अमरावतीच्या एका कंपनीत नोकरीला होते. एमआयडीसीला सुट्टी असल्याने संपूर्ण परिवार घरी होता. देशमुख कुटुंबाच्या घरामोर काही महिन्यापूर्वी लोणारे कुटुंबाने घर खरेदी केले होता.

दुपारी रिकाम्या जागेवरुन देशमुख परिवाराला शिवीगळ करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून कुंदा देशमुख बाहेर आल्या. बाहेर आलेल्या कुंदा देशुमखांना पाहून देवानंद लोणारचा राग अनावर झाला आणि त्याने बेसावध कुंदा देशमुखांच्या डोक्यात पहारीने वार केला.

आईच्य किंचळण्याचा आवाज ऐकून सुरज बाहेर आला तर त्याच्या डोक्यात देखील वार करण्यात आला. मुलगा आणि पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून विजय देशमुख वाचवण्यासाठी आले तर त्यांच्यावर देखील वार केला. गोंधळानंतर आजबाजूच्या लोकांनी गर्दी केली होती. बघ्यांची गर्दी पाहताच लोणार आक्रमक झाला आणि त्याने पुन्हा मुलावर आणि आईवर वार केले. वार केल्यानंतर लोणार काहीच न झाल्याचा अविर्भावात घरी गेला.

घरी जाऊन पत्नी आणि मुलाला दुचाकीवर घेऊन फरार झाला. सर्व घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल करत लोणारचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. अद्याप लोणारे खून का केला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फ्रेजरपुरा पोलीस घटनेचा तपास करत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!