Amravati : काय सांगता! चक्क ८० वर्षांचे आजोबा अडकले विवाहबंधनात…
Amravati : एक अनोख्या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण लग्नाच्या मंडपात ८० वर्षाच्या नवरदेवाचे ६५ वर्षाची नवरीसोबत थाटात लग्न लावून देण्यात आलं. अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या चिंचोली रहिमापूर या ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडला.
सध्या हा विवाहसोहळा ट्रेंडींगचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे या विवाहसोहळ्यात नवरदेवाचा ५० वर्षीय मुलगा वरातीत डान्स करताना दिसत होता. दोन दिवसांपूर्वी पार पडलेला एक अनोखा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरत आहे. Amravati
८० वर्षांचे आजोबा अडकले विवाहबंधनात…
अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथील रहिवासी असणारे ८० वर्ष वयाचे विठ्ठल खंडारे यांच्या पत्नीचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांना चार मुलं, मुली, नातवंड, नात सुना असा गोतावळा आहे.
नातलगांचा भलामोठा गोतावळा असतानाही विठ्ठल खंडारे यांना विरहपणा टोचत होता. ऐन ८० वर्षात विठ्ठल यांनी पत्नी गेल्यानंतर काही वर्षांनी आपल्याला लग्न करायचं, असा विचार मुलांसमोर मांडला. सुरुवातीला मुलांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला.
लेकानं बघितली बापासाठी नवरी…
मात्र, विठ्ठलराव खंडारे यांचा लग्नाचा हट्ट कायम असल्यामुळे मुलांनी देखील आपल्या वडिलांचं लग्न लावून देण्याची तयारी दर्शवली. विठ्ठल यांच्या मुलांनी वडिलांसाठी नवरी शोधायला सुरुवात केली.
बायोडाटा, दिसायला हॅण्डसम, जॉब, पैसा, फ्लॅट अशा अपेक्षा नवरीबाईला नसल्याने तसे मुलगी शोधणे थोडे सोपे गेले. पण, वयाचा विचार करता नवरी शोधणे अवघड झाले होते. मात्र, तरीही बापासाठी लेकाने नवरी बघायला सुरुवात केली. बापाचा हट्ट पूर्ण करायचाच, असा निर्धारच जणू काय या मुलांनी केला होता.