हवेली बाजार समितीवर राष्ट्रवादी चा १० जागांचा पॅनेल जाहीर ! उर्वरीत जागांवरील उमेदवार गॅसवरच !!

उरुळी कांचन : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून गणल्या जाणाऱ्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने १० उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे उर्वरीत ५ जागांसाठी इच्छुक अजूनही गॅसवर असणार आहेत.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची १९ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी न्यायालयात गेलेल्या राष्ट्रवादीच्या बंडोखोर नेत्यांनी भाजपसह सर्वपक्षीय पॅनेल उभा केला आहे. बंडखोरांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी पक्षनिष्ठेचा मुद्दा उपस्थित करीत खुद्द अजित पवार यांना हवेली बाजार समितीच्या निवडणूकीसाठी पॅनेल उभे करण्यास भाग पाडले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी ने १० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहे. या जागांसाठी नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. तालुक्यात जाहीर झालेल्या नावांत पूर्व, पश्चिम भागात पक्षाने संधी दिली आहे. उर्वरीत जागांसाठी पक्षाकडून अद्याप अंतिम यादी होणे बाकी असल्याने साधारण डझनभर उमेदवार उमेदवारी च्या चिंतेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस ने आण्णासाहेब मगर सहकार पॅनेलच्या माध्यमातून जाहीर केलेल्या उमेदवार पुढीलप्रमाणे:-
सेवा सहकारी संस्था गट – शेखर सहदेव म्हस्के (कळस ), संतोष आबासाहेब कांचन (उरुळी कांचन ), अशोक सुदाम गायकवाड (कोलवडी ),योगेश बाळासाहेब शितोळे (न्हावी सांडस) , सचिन सुभाष घुले(उंड्री )
महिला प्रतिनिधी
सरला बाबुराव चांदेरे (बाणेर )
भटक्या जाती / जमाती
अर्जून पिलाजी मदने
ग्रामपंचायत मतदारसंघ
राहुल रामचंद्र काळभोर
(लोणीकाळभोर )
रामकृष्ण हेमचंद्र सातव
(वाघोली)
नवनाथ रोहिदास पारगे
(डोणजे )