Amol Mitkari : तुला तुडवणार, कुत्र्यासारखा मारणार!! मनसे नेत्याची अमोल मिटकरी यांना उघड धमकी…


Amol Mitkari : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला. या कारणामुळे मनसैनिक संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणानंतर आता मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी अमोल मिटकरींना उघड धमकी दिली. तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच, तुला कुत्र्यासारखा मारणार, असे मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे म्हणाले आहे.

यावेळी त्यांनी अमोल मिटकरी यांना उघडपणे धमकी दिली. तसेच त्यांनी ‘पळून जाणं आमच्या रक्तात नाही. आम्ही पळवणारे लोक आहोत’, असे मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी म्हटले. Amol Mitkari

आम्ही पोलिस आणि संविधानाला मानणारे लोक आहोत. अजित पवारांनी जर तुम्हाला हात दिला नसता तर तुमची लायकी काय होती, हे अमोल मिटकरी यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण कोणाबद्दल बोलतो याचा विचार करावा. हे योग्य नाही, असे कर्णबाळा दुनबळे म्हणाले.

अमोल मिटकरी हा कुठेही काहीही भुंकत असतो. त्यामुळे या माणसाने किती बोलायचं हे आता त्यानेच ठरवायचं. आम्हाला नामर्दाची औलाद म्हणणा-या अमोल मिटकरींच्या आईचा मी अपमान करणार नाही. पण आम्हाला बोलायचं तर आम्ही तुम्हाला तुमचं सांगा, असंही बोलू शकतो. आम्ही ते बोललो का?’’ असा प्रश्नही कर्णबाळा दुनबळे यांनी उपस्थित केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!