Amol Mitkari : ब्रेकिंग! राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली, कार्यकर्त्यांचा मोठा राडा…
Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी काही अज्ञातांकडून फोडण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीचे तोडफोड करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते होते, अशी माहिती समोर येत आहे.
अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांंच्यावर टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. अकोल्यात हा प्रकार घडला.
राज ठाकरे यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र, मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. Amol Mitkari
मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. गाडीच्या तोडफोड प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
माझं वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अमोल मिटकरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. आपण कायदेशीरपणे कारवाई करु, असं अमोल मिटकरी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत.