Amol Mitkari : अमोल मिटकरी यांना अजित पवारांचा धक्का! मुख्य प्रवक्तेपदावरून हटवले, ‘या’ नेत्याची केली निवड…


Amol Mitkari : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच विविध राजकीय पक्षांनी फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. या फेरबदलाचा मोठा फटका आमदार अमोल मिटकरी यांना बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्या पक्षाने दणका दिला आहे.

अमोल मिटकरी यांचे मुख्य प्रवक्तेपद अवघ्या सहा महिन्यांच्या आत काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्याला सहा महिने पूर्ण होण्याच्या आधीच हे पद काढून घेण्यात आले.

राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची साथ दिली. त्यावेळी त्या गटाच्या पहिल्या बैठकीत आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती.

अजित पवार गटाचे एकूण सात प्रवक्ते आहेत. आता अमोल मिटकरींना मुख्य प्रवक्तेपदावरून दूर करून त्या ठिकाणी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Amol Mitkari

पक्षाच्या या निर्णयानंतर आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, मला पक्षाने दणका वगैरे काही दिला नाही. मागच्या वेळी प्रवक्ता म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आली होती. पक्षाचे एकूण सात प्रवक्ते असून उमेश पाटील हे आता मुख्य प्रवक्ते आहेत.

मुख्य प्रवक्ता हा मुंबईत राहणारा असावा, मी आकोल्यात राहतो. त्यामुळे पक्षाची योग्य तो समन्वय साधता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचे अभिनंदन. असे ते म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!