Amol Kolhe : …म्हणूनच अमित शहांना शरद पवारांची धास्ती!! खासदार अमोल कोल्हे यांची जोरदार टीका


Amol Kolhe : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अमित शहांवर निशाणा साधत सिन्नर सभा गाजवली आहे. शिवस्वराज्य यात्रेत बोलताना त्यांनी शहा यांचा चांगलाच समाचार घेतला. तर भाजपच्या धोरणांवर टीका केली आहे.

खासदार कोल्हे म्हणाले, राज्यातील सरकार ५० खोक्यांच्या मागे धावणारे आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार लोकांनी निवडून आणले. ही तर ‘लोकसभेसाठी अभी झाकी है, अभी विधानसभा बाकी है’, या शब्दात खासदार कोल्हे यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

ते पुढे म्हणाले , राज्यातील महायुतीच्या सरकारने सव्वा लाख कोटी रुपये कर्जासाठी पत्र दिले आहे. राज्य सरकारकडे पैसा नाही. लाडकी बहिण आणि लोकांसाठी कर्ज काढायची वेळ या सरकारवर आली आहे. खिशात नाही दमडा, पण मला बाजीराव म्हणा, अशी अवस्था या तिन्ही पक्षांची झाली आहे. महाराष्ट्र सरकारची परिस्थिती बिघडली आहे. Amol Kolhe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अटकाव करण्यासाठी सगळ्यांनी काम करावे, असा आदेश अमित शहा यांनी दिला आहे. याचा अर्थ त्यांना आपला पराभव आता दिसू लागला आहे. असे देखील ते म्हणाले आहे.

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या ताटात जेव्हा माती कालवली जाते, तेव्हा गुलाबी जॅकेट वाले का बर गप्प बसतात? शेतीमालाला भाव नाही. कांद्याला जेव्हा चांगला भाव येतो, तेव्हा निर्यात बंदी होते.

सोयाबीन आयात केली जाते. त्याचे भाव पाडले जातात. दूध आयात करण्यात येते. हे सगळे भाजप सरकारचे डाव आहेत. त्यांना जागा दाखवण्यासाठी नागरिकांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!