Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा!! पुढील ५ वर्षांसाठी केली संन्यास घेण्याची घोषणा….

Amol Kolhe : छोट्या पडद्यावर ऐतिहासिक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

शिरूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण पाच वर्ष उपलब्ध असेल, असं वक्तव्य शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी ५ वर्ष अभिनयातून संन्यास घेण्याची भूमिका जाहीर केली. शिरुर लोकसभा मतदारसंघाची ही जबाबदारी पुढील पाच वर्षांसाठी माझ्यावर आहे. या जबाबदारीच्या दृष्टीने, सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने, मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे.

मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावायची असतील तर अभिनय क्षेत्राला खूप जास्त वेळ मिळणे हे अवघड आहे. यामुळे प्राधान्य ठरवावे लागेल. मला मतदारसंघातील प्रोजेक्ट महत्वाचे आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील लोकांची काम महत्वाची आहेत, यासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घ्यावा लागला तरी घेईन. मी ही रजा पाच वर्षांसाठी घेणार आहे, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. Amol Kolhe
या पाच वर्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार पोहोचवणे हा अपवाद सोडला तर बाकी कुठेही तुम्ही मला स्क्रिनवर पाहाल असे मला वाटत नाही असेही खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहे.