Amol Kolhe : अमोल कोल्हे तर थेट भाजपचे कमळ हाती घेणार होते! भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट…


Amol Kolhe : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आता अनेकजण वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे भाजपचे कमळ हाती घेऊन, लोकसभा निवडणुकीत उभं राहायला इच्छुक होते, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा शिरूरमध्ये सुरू आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, हा आरोप करताना शिरूर लोकसभेत अमोल कोल्हेच्या नाटकाचा शेवटचा प्रयोग आहे. पाच वर्षे कोल्हेंनी राजकीय नाटकं केली, आता त्यांनी त्यांचा धंदा पाहावा. शिरूर लोकसभेत महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर शिरुर येथे आले होते.

यावेळी त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. यावर आता अमोल कोल्हे यांनी देखील पलटवार केला आहे. दरेकरांकडे इतकी चांगली विनोद बुद्धी आहे. याची मला कल्पना नव्हती. मात्र त्यांच्या या वक्तव्यानं मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, याचे सर्टिफिकेट दरेकरांनी दिले. Amol Kolhe

असे म्हणत अमोल कोल्हेनी  दरेकरांचे आभार मानले आहेत. यावरून शिरूरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आजकाल लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा, असा एक नारा दिला जातो.

त्या पात्रतेमध्ये मी बसत नाही, त्यामुळे दरेकरांना मी फीट वाटलो नसेल, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, म्हणून मी दरेकरांना फीट वाटलो नसेल, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. आता आगामी काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!