Amol Kolhe : केंद्र सरकार जनतेच्या प्रश्नावर बोलले की निलंबित करते, आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर खा. अमोल कोल्हेंचे टिकास्त्र…!
Amol Kolhe उरुळी कांचन : निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कांदा निर्यात बंद केली, इथेनॉल निर्यात बंद केली, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा म्हटलं की गदारोळ हे कारण देऊन मला व सलग आठवेळा संसदरत्न ठरलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसदेतून निलंबित केले जात मग. शेतकऱ्यांचा आवाज सरकार ऐकत नसेल तर सरकारपर्यत पोहोचवण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे असल्याचे प्रतिपादन शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घेऊन खा. सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (दि.३०) आक्रोश मोर्चात बोलताना खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले. Amol Kolhe
यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), व कॉंग्रेसचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार, ज्येष्ठ नेते के. डी. कांचन, प्रकाश म्हस्के, सोपान कांचन, देविदास भन्साळी, हवेली तालुका अध्यक्ष संदिप गोते, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, भवरापूरचे सरपंच सचिन सातव, टिळेकरवाडीचे सरपंच सुभाष लोणकर, सुभाष टिळेकर, विकास लवांडे, विजय तुपे, रामभाऊ तुपे, अर्जुन कांचन, सविता कांचन ,योगिनी कांचन , काका कुंजीर, काळूराम मेमाणे, राजेंद्र टिळेकर, आप्पा डोंबे , जगदिश महाडीक आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यापुढे बोलताना कोल्हे म्हणाले, ” हा आक्रोश मोर्चा हा शेतकऱ्यांच्या जनभावना सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी आहे. शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला केंद्र सरकारच्या धरसोड धोरणाने नुकसानीस ढकलत आहे. उसाच्या व कारखानदानदारीच्या धोरणात केंद्र शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. संसदेत हा प्रश्न मांडण्यात निलंबन कारण पुढे करुन शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. हा आक्रोश मोर्चा सुरू झाल्यापासून शेतकरी, दुधउत्पादक, व सर्वसामान्य नागरिकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. तुमच्या हक्कासाठी मागण्यांसाठी कायम लढणार असल्याचे कोल्हे म्हणाले.