Amol Kolhe : ‘ते’ गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत! अमोल कोल्हे यांनी कोणावर केला हल्लाबोल?, जाणून घ्या…

Amol Kolhe : राज्याच्या राजकारणात सध्या शिरूर मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीत टक्कर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आढळराव पाटील इच्छूक असल्याच्या चर्चा आहेत. यावरून आता अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आढळराव पाटील गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत अशी जोरदार टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे. आज पुण्यातून राष्ट्रवादीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. Amol Kolhe
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, आढळराव पाटील हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. ते एक वयस्कर नेते असून त्यांचा डिजिटल जीवनाशी काही संबंध नाही. त्यामुळे त्यांना कोणीतरी माझे सोशल मीडिया पेज दाखवावेत माझ्या सर्व कामांची माहिती त्या ठिकाणी आहे. अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
काय म्हणाले होते आढळराव पाटील?
जनता गेल्या ५ वर्षांपासून आक्रोश करत होती. मात्र खासदार तेव्हा जराही जनतेत आले नाहीत, साधे फिरकलेही नाहीत. आता आगामी निवडणुकांमुळे आक्रोश यात्रा काढत आहेत, अशी टीका माजी खासदार आढळराव पाटील यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे.