Amol Khatal : संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांना पराभवाची धूळ चारणारे अमोल खताळ आहेत तरी कोण? राज्यात ठरले जायंट किलर…


Amol Khatal : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सध्या जाहीर होत असून, जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. आतापर्यंतच्या निकालाच्या आकड्यांमधून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून, काही अपवाद वगळता, थेट राज्यात सुपडा साफ झाल्याचं चित्र आहे.

मात्र या सर्व पराभवामध्ये काही जागांची चर्चा जास्त होते आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून झालेला पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो आहे.

या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव तर केलाच. परंतु राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांना यात पराभवाचा सामना करावा लागला व यामध्ये आपल्याला संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला समजला जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. Amol Khatal

परंतु यामध्ये जर आपण संगमनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बघितली तर ही खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव हा शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ या नवख्या तरुणाने केला. त्यामुळे महाराष्ट्राला नक्कीच प्रश्न पडला असेल की नेमका अमोल खताळ आहेत तरी कोण? हे जाणून घेऊयात…

संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला असून, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणही आता पराभवाच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. राज्याच्या इतिहासात यंदाचा भाजपचा विजय हा अत्यंत मोठा विजय म्हणून पाहिला जाऊ शकतो.

बाळासाहेब थोरात हे नवव्या वेळेस यंदा विधानसभा निवडणुकीला सामोरं जात होते. तर त्यांच्या विरोधात असलेले अमोल खताळ हे एक नवखे तरुण म्हणून त्यांच्यासमोर होते. त्यामुळे अमोल खताळ हे जायंट किलर ठरलेले आहेत.

अमोल खताळ यांच्या विजयाची कारणं जाणून घेताना विखेंबद्दलही बोलणं अपरिहार्य ठरतं. कारण अमोल खताळ यांच्या विजयासाठी राधाकृष्ण विखे यांनी मोठी ताकद लावून मायक्रो प्लॅनिंग केल्याचं दिसलं होतं. त्यामुळे या परभवात पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे विखे विरुद्ध थोरात असा लढा पाहायला मिळाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!