अमिताभ बच्चनची लेक बारामतीत! पवार कुटुंबियांनी केलं स्वागत…!

बारामती : काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन हे चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने बारामतीत आले होते याची आठवण बारामतीकरांना आहेच पण काल अमिताभ बच्चन यांच्या कन्या श्वेता नंदा या खास विमानाने बारामतीत आल्या होत्या. त्यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली आणि संध्याकाळी त्यांच्या स्वागतासाठी हुरडा पार्टीची सोय करण्यात आली होती.
बारामतीत काल सकाळी बिगबी अमिताभ बच्चन यांच्या कन्या श्वेता बच्चन नंदा या खास विमानाने बारामतीत आल्या. त्यांच्या स्वागतासाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे हे स्वतः बारामती विमानतळावर उपस्थित होते.
बारामतीत आल्यानंतर श्वेता आणि त्यांच्या मैत्रिणींनी बारामतीच्या विविध विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर बारामतीच्या एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अटल इंक्युबॅशन सेंटर मध्ये त्यांचे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे गुणदर्शन सादर करून स्वागत करण्यात आले. यावेळी हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित होत्या.