Amitabh Bachchan : जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया, चाहत्यांच्या चिंतेत झाली वाढ, जाणून घ्या…

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. अमिताभ बच्चन यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये स्वतःची टीम तयार केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. पण त्यांच्या या पोस्टमुळे चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.फोटोंमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हाताला पट्टी लावलेली दिसत आहे.

तर हाताला काळ्या रंगाची पट्टी का लावली आहे. याचं कारण खुद्द अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून दिलं आहे. हाताची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना दिली आहे.

बिग बी यांच्या शस्त्रक्रियेची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली, पण आता अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाताची शस्त्रक्रिया झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग साठी जाहिरात देखील शूट केली आहे. Amitabh Bachchan
बिग बी यांनी अभिनेता अक्षय कुमार आणि सुर्या यांच्यासोहत जाहिरातीचे शुटिंग केले आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, इंडियन प्रीमियर लीगच्या आधारे तयार केली आहे. या लीगमध्ये अनेक सामने पार पडणार आहेत.
यात अनेक स्टार्सनी आपापल्या टीम बनवल्या असून अमिताभ बच्चन हे मुंबई टीमचे मालक आहेत. अक्षय कुमारची टीम श्रीनगर आहे.सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांनी चर्चा रंगली आहे.
