Amitabh Bachchan : आमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! ८१व्या वर्षी पार पडली शस्त्रक्रिया, कारण काय?, जाणून घ्या..

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. त्यांची अँजिओप्लास्टी झाली असल्याची माहिती आहे. ८१ वर्षीय बिग बींना हार्ट ब्लॉकेजनंतर त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केले होते. चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. पायात क्लॉट झाल्यानं अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. अशी माहिती समोर आली आहे.
अमिताभ बच्चन यांनी अँजिओप्लास्टीनंतर नुकतेच एक ट्विट शेअर केले आहे, ज्यात त्यांनी असे लिहले की,”मी तुमचा सदैव आभारी आहे.” सध्या अमिताभ बच्चन हे रुग्णालयातच असून त्यांना अद्याप डिस्चार्ज मिळालेला नाही. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया ज्ञात आली नाही. त्यांच्यावर डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन आगामी काळात अनेक प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच प्रभास आणि दीपिका पादुकोण स्टारर कल्कि २८९८ एडी या सिनेमातून बिग बी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बिग बी शेवटचं टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांच्यासोबत गणपत सिनेमात दिसले होते.