महिलांसाठी खुशखबर! दरमहा ३००० रुपये मिळणार, अमित शाह यांची मोठी घोषणा…

नवी दिल्ली : संपूर्ण देशात सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची चर्चा आहे. राजकीय पक्ष जोरदार प्रचार करण्यात व्यस्त आहेत. अशातच आता भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

या जाहीरनाम्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर आणि आरोग्य सुविधांवर भर देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीरनामा सादर करताना, हा जाहीरनामा राज्यातील प्रत्येक घटकाला नवी आशा देणारा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत दृष्टिकोनाशी सुसंगत आहे अशी माहिती दिली. यावेळी अमित शहा यांनी महिलांसाठी मोठी घोषणाही केली.
भाजपच्या या जाहीरनाम्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर आणि आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा ३००० रुपये थेट आर्थिक मदत दिली जाईल. ही मदत विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

या निर्णयामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल, तसेच त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठीही मदत होईल. याशिवाय महिलांची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता वाढवण्यासाठीही विविध योजना राबवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
जाहीरनाम्यात आरोग्य क्षेत्रावरही विशेष भर देण्यात आला आहे. आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करून अधिकाधिक लोकांना मोफत उपचारांची सुविधा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आजारांचे लवकर निदान होऊन उपचार अधिक सोपे आणि परवडणारे होतील.