दिल्लीत हालचालींना वेग! अमित शहांची चंद्राबाबू नायडूसोबत चर्चा, युतीची चाचपणी सुरू…

नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभा निवडणुका एका वर्षावर आल्या आहेत. यामुळे यासाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष एकत्र येत आहेत.
भाजप विरोधी पक्ष सध्या एकत्र येत आहेत. आता भाजप देखील याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आता टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. यामुळे भाजपने लोकसभेची तयारी केल्याचे दिसून येत आहे. शहा आणि नायडू या नेत्यांनी आंध्र प्रदेशात एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा केल्याचे समजते आहे.
याठिकाणी चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. यामुळे भाजप त्यांना सोबत घेऊ शकतो. दरम्यान, आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर विशेष दर्जाच्या मागणीवरून 2018 चंद्राबाबू नायडू यांनी भाजपपासून लांब गेले.
आता ते अगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्याच्या हेतून पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याची तयारी करत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.