Amit Shah : दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शहांकडून आज उच्चस्तरीय बैठक, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार…


Amit Shah : जम्मू भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटना आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबाबत आज गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक होणार आहे. ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.

नॉर्थ ब्लॉकमध्ये सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल, एनएसए अजित डोवाल, गृह सचिव, आयबी प्रमुख, रॉ प्रमुख, एनआयएचे डीजी, सर्व निमलष्करी दलांचे डीजी, लष्कर आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गृह मंत्रालयाचे इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दहशतवाद संपवण्यासाठी आखली जाणार योजना..!!

सकाळी ११ वाजता नॉर्थ ब्‍लॉक मध्ये होणाऱ्या या बैठकीत जम्‍मू-काश्मीरचे उपराज्‍यपाल, NSA अजित डोवाल, गृह सचिव, IB चीफ, रॉ चीफ, NIA चे DG सर्व निमलष्करी दलांचे डीजी, लष्कर आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गृह मंत्रालयाचे इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत आयबी आणि रॉचे प्रमुख सध्याच्या गुप्तचर अहवालाची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देतील. एवढेच नाही तर या बैठकीत जम्मू भागात गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू प्रदेशातून दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी एकात्मिक योजना तयार केली जाऊ शकते. Amit Shah

या बैठकीत अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेवरही चर्चा होणार आहे. अमरनाथ यात्रा कडेकोट बंदोबस्तात पार पडणार असून, आवश्यक सैन्य आणि उपकरणांचा आढावा घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच अमरनाथ यात्रेच्या मार्गावर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून AI आधारित मॉनिटरिंग केले जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!