Amit Shah : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी दिला देवेंद्र फडणवीस यांना मोलाचा सल्ला, नेमकं काय म्हणाले?


Amit Shah : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री (ता.८) रविवारी मुंबईत दाखल झाले. अमित शहा रात्री उशिरा मुंबईत पोहोचले आणि त्यांनी भाजप कोअर कमिटीची बैठकही घेतली. याचवेळी, अमित शहा यांनी महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत,अशी सूचना केल्या.

अमित शहा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहे. अमित शहा यांनी रविवारी आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाचं दर्शन घेतले. यांनतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा केली.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती टाळावी, असा सल्लाही अमित शहांनी दिला. तसेच, एकजूट होऊन विधानसभा निवडणूक लढवण्याची सूचना दिली आहे. Amit Shah

दरम्यान, अमित शहा यांनी राज्यातील सद्यस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या तयारीबाबत दोन तास चर्चा झाली. या बैठकीत भाजपने १५० जागांवर निवडणूक लढवण्याचा आणि किमान १२५ जागांवर निवडणूक जिंकण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीला अजून दोन महिने बाकी असताना अमित शहा मुंबईत आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि ‘लाडकी बहिन योजने’चे श्रेय घेण्यासाठी महायुतीमध्ये चढाओढ सुरू आहे. त्याचवेळी गृहमंत्र्यांनी बदलापूरमधील अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण प्रकरण आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली माफी याबाबतच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी भाजप नेत्यांनी तयार केलेले नियोजनही अमित शहा यांनी समजून घेतले. महायुतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत मतभेद असले तरी युती अखंड ठेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याच्या सूचनाही अमित शहा यांनी दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!