Pune News : मित्राच्या बहिणीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार! आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल…!!

Pune News पुणे : भावाच्या मित्राने अल्पवयीन बहीणीसोबत ओळख वाढवून तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेऊन गरोदर ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्या पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश उर्फ दिपक जाधव (रा. कात्रजगाव, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत आरोपीच्या घरी घडला असून तो तिला धमकी देऊन तीच्यावर अत्त्याचार करत होता. Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित अल्पवयीन मुलीच्या भावाचा मित्र आहे. आरोपीने मुलीसोबत ओळख करुन
तिला वेळोवेळी फोन केला.

तसेच तुला सुखात ठेवीन असे सांगून मुलीला त्याच्या घरी बोलावून घेतले.त्यानंतर आरोपीने मुलीच्या इच्छे विरुद्ध तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार घरच्यांसमोर आला.
त्यानंतर कुटुंबियांनी पीडितेला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता तिने सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
