निवडणुकीच्या धामधुमीत बदल्यांचा धडाका ; गृह विभागाकडून दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश


पुणे :राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असतानाच आता गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश विभागाकडून जारी केले आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पुणे पोलीस दलाचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती आता वर्धाचे पोलीस अधीक्षक, वर्धा म्हणून करण्यात आली आहे.तर, वर्धाचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची बदली नागरी हक्क संरक्षण विभागात पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि प्रशासकीय फेरबदलांचा भाग म्हणून या बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात नुकत्याच नगर परिषद, नगर पंचायती निवडणुकांचे निकाल लागले. मागील आठवड्यापासून राज्यात महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे. तर, आजपासून रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी आजपासूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

       

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे आणि शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी, महानगरपालिका निवडणुकांमध्ये मात्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. या निवडणुकीच्या तोंडावरच आता आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!