अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कर्करोग…!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना त्वचेचा कर्करोग झाला होता. व्हाईट हाऊसचे डॉक्टर केविन ओ’कॉनर म्हणाले की बायडेन यांच्या छातीच्या त्वचेवर जखम झाली होती. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शस्त्रक्रियेत जखम असलेली त्वचा काढण्यात आली आहे. त्याची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले होते.

ज्यात ही जखम बेसल सेल कार्सिनोमाची असल्याचे उघड झाले. जो त्वचेच्या कर्करोगाचा एक सामान्य प्रकार आहे. डॉक्टर ओ’कॉनर यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेदरम्यान कर्करोग पसरवणा-या सर्व ऊती पेशी काढून टाकण्यात आल्या आहेत. तर उपचारानंतर बायडेन आता पूर्णपणे बरे झाले आहेत. तर त्यांना आता कोणत्याही उपचाराची गरज नसली तरी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणा-या आरोग्य अधिका-यांनी माध्यमांना दिली आहे.
Views:
[jp_post_view]