Ameen Sayani : रेडिओवरील ‘गीतमाला’तील ‘सूरमणी’ हरपला! आवाजाचे जादूगार अमीन सयानी यांचे निधन..


Ameen Sayani : आवाजाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. सयानी यांना आज सकाळी सहा वाजता हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सयानी यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली असून, गुरुवारी, २२ फेब्रुवारीला सयानी यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमीन सयानी यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत सेलिब्रिटींसह त्यांचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत.

रेडिओवर तब्बल ४२ वर्षे चाललेल्या ‘बिनाका गीतमाला’ या त्यांच्या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाने यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. अमीन सयानी यांना ऐकण्यासाठी त्यांचे चाहते दर आठवड्याला वाट पाहायचे. ‘गीतमाला’मुळे अमीन सयानी हे भारतातील सर्वात पहिले होस्ट बनले होते. त्यांनी हा संपूर्ण शो सादर केला होता. अमीन सयांनी यांनी या शोच्या माध्यमातून रेडिओ जगतामध्ये आपले वेगळेच स्थान निर्माण केले होते. त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. Ameen Sayani

अमीन सयानी यांच्याविषयी अनेक रंजक गोष्टी मनोरंजन क्षेत्रातून ऐकण्यात येतात. सूत्रांच्या मते,अमिताभ बच्चन हे उत्तर प्रदेशातून ज्यावेळी मुंबईत आले त्यावेळी त्यांनी रेडिओ निवेदक सयानी यांची भेट घेण्याचा खूप प्रयत्न केला. कारण बच्चन यांची रेडिओमध्ये निवेदकांचे काम करायची इच्छा होती. मात्र बच्चन यांच्या जड आवाजामुळे सयानी यांनी बच्चन यांना भेटण्यास नकार दिला होता. यामुळे अमिताभ यांची रेडिओवर काम करण्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि बच्चन चित्रपट क्षेत्राकडे वळले.

दरम्यान, अमीन सयानी यांच्या नावावर रेडिओवरील ५४ हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम होते. हे कार्यक्रम प्रोड्युस करणे, त्यांना व्हॉईसओव्हर देण्याचे काम देखील त्यांनीच केले होते. जवळपास १९ हजार जिंगल्सना आवाज देण्यासाठी अमीन सयानी यांचे नाव लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!