अंबादास दानवेंनीं बॉम्ब फोडला; शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांचा बंडलं मोजतानाचा व्हिडीओ,अधिवेशनात वातावरण तापणार

पुणे : ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडला आहे. ज्यात शिंदे गटाचे आमदार महिंद्र दळवी नोटांच्या ढिगार्यासोबत दिसत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहेत? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. त्यामुळे याची पडसाद आता अधिवेशनात उमटणार असल्याने राजकीय वातावरण आणखीनच तापणार आहे.
अंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी थेट अंबादास दानवे यांना आव्हान केल आहे.हा व्हिडिओ फेक असल्याचं त्यांनी म्हटल असून जर त्या ते अंशता: असतील तर आमदारकीचा राजीनामा देण्याच त्यांनी म्हटल आहे
मात्र याबाबत अंबादास दानवे म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील काही आमदार त्यात दिसत आहेत. मोठ्या नोटांच्या गड्या त्यात दिसून येत आहेत. कोणाच्या आहेत, काय आहेत हे तपासले पाहिजे. मी याबाबत तक्रार करणार आहे. मी यात कोणाचं नाव घेत नाही पण पोलिसांनी हे शोधले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.