धक्कादायक! दीड हजारासाठी वारजे माळवाडीत अमरजीत गोयलचा ब्लेडने वार करून खून
पुणे : पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. मोबाईलचे पैसे न दिल्याच्या रागातून एकाने गळ्यावर ब्लेडने वार करुन तसेच डोक्यात मारुन खून केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ माजली आहे.
याबाबत माहिती अशी की, वारजे पोलिसांनी राम श्रीमंत वाघमारे वारजे पुलाजवळ याला अटक केली आहे. अमरजीत जगन्नाथ गोयल असे खून झालेल्याचे नाव आहे.
याबाबत वारजे पुलाजवळील बराटे गार्डनसमोर फुटपाथ एक जण जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याचे तसेच डोक्यात मारहाण केल्याने त्याचा मृत्यु झाल्याचे म्हटले. पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यावर निलेश खोजे व गणेश टाळकुटे यांच्याकडून माहिती मिळाली.
अमरजीत गोयल व राम वाघमारे हे दोघेही फुटपाथवर रहात होते. गोयल याला वाघमारे याने जुना मोबाईल दिला होता. मात्र, त्याचे दीड हजार रुपये गोयल देत नव्हता. त्याच्यातून दोघांमध्ये वाद झाला.