मार्च उजाडला तरी फेब्रुवारीचा हप्ता नाही, लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार?, मोठी माहिती आली समोर..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या ७ हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली आहे.

फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. मार्च महिना उजाडला तरी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. आता स्वत: मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
हेत.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात नेमका कधी जमा करायचा, किती तारखेला पैसे जमा होतील आणि कधीपासून पैसे थेट बँकेत जमा होण्यास सुरुवात होतील? याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.

दरम्यान, आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये आणि मार्च महिन्याचे १५०० रुपये असे एकूण ३००० रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम येत्या आठ दिवसांत पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
