मोठी बातमी! सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधीही अडचणीत, ईडीकडून ७०० कोटींच्या जप्तीची कारवाई सुरू, नेमकं काय प्रकरण?


नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात गांधी कुटुंबाच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) च्या जप्त केलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

त्यांच्याशी संबंधित असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या कंपनीच्या 700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया ED ने शनिवारी आज सुरू केली आहे.

या मालमत्तांमध्ये दिल्ली, मुंबई आणि लखनौ येथील प्रमुख व महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. यामध्ये राजधानी दिल्लीतील बहादूरशहा जफर मार्गावरील हेराल्ड हाऊस या प्रतिष्ठित इमारताचीही समावेश आहे.

दरम्यान, ईडीने सांगितले की, ही कारवाई AJL मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या अनुषंगाने केली जात आहे. ही प्रक्रिया प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अ‍ॅक्ट (PMLA) २००२ च्या कलम ८ आणि मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक (जप्त केलेल्या किंवा गोठवलेल्या मालमत्तेचा ताबा घेणे) नियम २०१३ अंतर्गत करण्यात येत आहे.

नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र प्रकाशित करणारी कंपनी AJL ही यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स आहेत, ज्यामुळे ते मुख्य भागीदार ठरतात.

या प्रकरणात सुमारे ९८८ कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई झाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. हे पैसे गुन्ह्यातून कमावले गेले होते आणि त्याचा गैरवापर झाला होता, असे एजन्सीचे मत आहे. या कारणास्तव, २० नोव्हेंबर २०२३ रोजी, ईडीने एजेएलची सुमारे ६६१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि ९०.२ कोटी रुपयांचे शेअर्स तात्पुरते जप्त केले होते. १० एप्रिल २०२४ रोजी, सक्षम अधिकाऱ्यांनी या जप्तीचे समर्थन केले आहे, ज्यामुळे ईडीला या मालमत्ता ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची मुळे २०१४ मध्ये दाखल झालेल्या तक्रारीशी जोडलेली आहेत. ही तक्रार भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात दाखल केली आहे. त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत मोतीलाल व्होरा, दिवंगत ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि यंग इंडियन नावाच्या कंपनीवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला होता. तक्रारीत असे म्हटले आहे की या लोकांनी मिळून एजेएलच्या २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता फसवणूकीने मिळवल्या आहेत.

ईडीच्या तपासात असेही समोर आले आहे की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या यंग इंडियनने एजेएलच्या इतक्या मोठ्या मालमत्तेची मालकी फक्त ५० लाख रुपयांना मिळवली. एजन्सीचा असा विश्वास आहे की हा व्यवहार मनी लाँड्रिंगचा एक भाग होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!