Allu Arjun Arrest : मोठी बातमी! पुष्पा २ प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक, नेमकं प्रकरण काय?


Allu Arjun Arrest : सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना स्टारर पुष्पा २ : द रुल बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवताना दिसतोय. रिलीज झाल्यापासून हा सिनेमा जोरदार कलेक्शन करताना दिसत आहे. एकीकडे पुष्पा २ कोटींचं कलेक्शन करत असताना अल्लू अर्जुनला अटक झालं आहे.

४ डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रिमीयर शोवेळी थिएटरमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे.

हैदराबादच्या आरटीसी एक्स रोडवर असलेल्या ‘संध्या’ सिनेमा हॉलबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिची दोन मुले जखमी झाली. यानंतर हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. Allu Arjun Arrest

हैदराबादमध्ये ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 39 वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू आणि तिच्या मुलाच्या गंभीर दुखापतीनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!