मशिदीत हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी द्या, महंत अनिकेतशास्त्री यांची मागणी…

नाशिक : महंत अनिकेतशास्त्री यांनी मशिदीत हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.
यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे.
ते म्हणाले, त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेल्या घटनेनंतर मी मुस्लिम बांधवांना विनंती करतो की, भाईचा-याच्या नात्याने आम्हालाही मशिदीत हनुमान चालीसा म्हणण्याची परवानगी द्यावी, अन्यथा ही नौटंकी बंद करावी.
दरम्यान, एका जमावाने बळजबरीने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केला आहे. काल नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदू महासभेतर्फे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले आहे.
यामुळे हा वाद सुरू झाला आहे. आतापर्यंत चार उरूस आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.