Alia Bhatt : धक्कादायक! आता अभिनेत्री आलिया भट्टचाही डिपफेक व्हिडीओ व्हायरल, अश्लील हावभाव अन्…
Alia Bhatt : गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक डीपफेक व्हिडीओ समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बॉलिवूड अभिनेत्री कटरिना कैफ यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
आता यांच्यापाठोपाठ बॉलिवूडची सध्याची टॉपची अभिनेत्री आलिया भट्टचा डिपफेक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामुळे याबद्दल आणखी चर्चा वाढली आहे.
तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे अभिनेत्री ‘डिपफेक’ची शिकार झाल्याचं म्हटलं जात आहे. ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर चाहत्यांची चिंता वाढली आहे. Alia Bhatt
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिन्ट असलेला ड्रेस परिधान केलेली एक मुलगी कॅमेऱ्यासमोर अश्लील चाळे करताना दिसत आहे. खरंतर, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत असलेली मुलगी आलिया भट्ट नाही आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करत अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा गैरवापर करण्यात आला आहे. Alia Bhatt
आलिया भट्टच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहतानाच हा एडिटेड व्हिडीओ असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आलियाच्या चेहऱ्याचा वापर केलेली मुलगी नक्की कोण आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
आलिया भट्टच्या व्हायरल होणाऱ्या या डिपफेक व्हिडीओमुळे मात्र सायबर सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सेलिब्रिटीजच्या चेहऱ्याचा असा होणारा गैरवापर पाहून बऱ्याच लोकांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. रश्मिका मंदानाच्या व्हिडीओप्रकरणी नुकतंच दिल्ली पोलिसांनी बिहारमधून १९ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
रश्मिका मंदानाने डिपफेकची शिकार झाल्यानंतर एक व्हिडीओ शेअर करत चिंता व्यक्त केली होती. अभिनेत्री म्हणालेली, माझ्यासाठी नव्हे तर प्रत्येकासाठी हे खूप भीतीदायक आहे. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करण्यात येत आहे. आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून जे माझ्या पाठिशी आहेत त्यांचे मी आभार मानते.