पावसाची जोरदार हजेरी! 2, 3, 4 आणि 5 जानेवारीला अलर्ट जारी, पावसासह गारपीटचा इशारा…


पुणे : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजी राज्यातील काही भागात अचानक मुसळधार पाऊस झाला. मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका होता. मात्र, यादरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे लोकांची फजिती झाली.

देशातील अनेक भागात अजूनही पाऊस असून राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. जानेवारी महिन्यातही मुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला असून पुढील काही दिवस पाऊस कायम राहणार आहे. आजही काही भागात दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात जानेवारी महिन्यातही थंडी कायम राहिल. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहिल. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पाऊस काही भागात असेल. जानेवारीच्या संपूर्ण महिन्यात राज्यातील काही भागात कमी अधिक पाऊस कायम राहिल. राज्यातून पूर्णपणे पाऊस जाणार नाही आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मेरठ, गाझियाबाद, नोएडा, हापूर, बागपत, बुलंदशहर, सहारनपूर, शामली, मोरादाबाद, बिजनौर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 2 ते 5 जानेवारी दरम्यान जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता आहे, हेच नाही तर देशातील काही भागात गारपीठ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!