महाराष्ट्रात आज अलर्ट, ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या…


पुणे : फेब्रुवारी महिन्यात राज्यातून थंडी जवळपास गायब असून उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून वातावरणात चढउतार बघायला मिळत आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दुपारच्यावेळी उकाडा असेल. दुपारच्यावेळी 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. यासोबतच अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला. यासोबतच उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी कायम असेल.

मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक पुन्हा वाईट श्रेणीत पोहोचलाय. हवा पुन्हा दुषित झालीये. दृष्यमानतेवर परिणाम स्पष्ट दिसून येतोय. आज मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 204 वर पोहोचलाय. पीएम 10 चं प्रमाण 180 वर तर पीएम 2.5 चं प्रमाण 151 वर गेलेय.

दरम्यान, आगामी 48 तासांत किमान तापमानात 2-3 अंशांची घट होणार असल्याने राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. मुंबईत सकाळी धुरकट वातावरण तर दुपारी आकाश निरभ्र असेल. कमाल तापमान 35 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याने उन्हाचा चटकाही जाणवणार आहे.

राज्याच्या हवामानात सध्या मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात संमिश्र हवामान राहण्याची शक्यता आहे. काही भागांत थंडीची लाट येण्याचे संकेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!