आळंदी हादरली! 19 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करून आळीपाळीने अत्याचार अन लग्नासाठी धमकी


पुणे : पुणे जिल्ह्यातील आळंदीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आळंदी मध्ये एका 19 वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीचं मागील महिन्यात 2 जून रोजी अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तिला आळंदी येथील केळगाव रोडवर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जबरदस्तीने डांबण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर वारंवार लग्नासाठी दबाव टाकला गेला अन् तिच्यावर बलात्कार केला गेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात आपल्या राहत्या घरी असलेल्या तरुणीला भेटण्यासाठी एक महिला कीर्तनकार आल्या. त्यावेळी पिडीत तरुणी घरात एकटी होती. शेतात फिरून येऊ, असं म्हणत तिला घराबाहेर आणलं. त्यानंतर तिला काळ्या चारचाकी गाडीत ढकललं तसेच जास्त आवाज करु नको नाहीतर चेहऱ्यावर अॅसिड टाकेल, अशी धमकी दिल्यामुळे तिला गप्प बसावं लागलं. आळंदीत आणल्यानंतर अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, कीर्तनकार सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवलअन् वारंवार बलात्कार करण्यात आला.

या सर्व प्रकाराने धास्तावलेल्या पीडित तरुणीने मोठी हिंमत दाखवून 112 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली अन् आता आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!